शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 एप्रिल 2022 (16:24 IST)

एका मुलीचे 6 महिन्यात 6 लग्न

marriage
दौलताबाद किल्ल्याच्या परिसरात नुकतेच लग्न झालेल्या नवर्‍याला सोडून पळून गेलेल्या नवरीमार्फत एक मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.
 
हे रॅकेट मराठवाडा, खान्देशासह गुजरातमध्येही पसरले असल्याची माहिती मिळत आहे. लग्न होत नसलेल्या मुलाच्या कुटुंबांना हे टार्गेट करत दोन ते पाच लाखात वधू विकत होते. जळगाव येथील दोन महिला हे रॅकेट चालवतात आणि यांनी स्वत:च्याच भाचीचे सहा महिन्यात तब्बल सहा वेळा लग्न लावले. अमळनेर येथे त्यांचे बिंग फुटले आणि मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
 
26 मार्च रोजी दौलताबादजवळ मावसाळा गावातील एका कुटुंबाला फसवल्यानंतर 20 वर्षी तरुणीने तेथून पळ काढला आणि अमळनेर गाठले. तेथे 6 एप्रिल रोजी दुसर्‍या मुलासोबत लग्न केले. तोपर्यंत हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरुन मित्रासोबत लग्न करणारी मुलगी तीच असल्याचा संशय आला आणि त्यांनी पोलिसांना बोलावले. या रॅकटने मुलाच्या कुटुंबाकडून घेतलेले 2 लाख परत दिले आणि पोबारा केला. पण हा प्रकार दौलताबाद पोलिसांना कळताच त्यांनी 10 एप्रिल रोज तरुणीला ताब्यात घेतले.
 
अंमळनेर येथून अटक झालेल्यांचे नावे आशा गणेश पाटील, लता बाबूराव पाटील, रिंकू पाटील आणि अंड्यावाल्या काकू आणि बाबूराव रामा खिल्लारे असे आहेत. तर मुलगी अनाथ असून लता आणि आशा यांनी तिचा सांभाळ केला म्हणून त्यांच्या सांगण्यावरून मी लग्न केले आणि आतापर्यंत सहा लग्न केले असून एका लग्नासाठी दोन ते पाच लाख रुपये मिळतात, अशी कबूली तरुणीने दिली आहे.