रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 मार्च 2020 (17:06 IST)

बँक खाते हॅक करून २०० कोटी रुपये पळविणाऱ्या ७ जणांना अटक

एका कॉर्पोरेट कंपनीचं बँक खातं हॅक करून, त्यातून अवैधरित्या २०० कोटी रुपये दुसऱ्या बँक खात्यात वळण्याचा प्रयत्न करणाऱ्या सात जणांना पालघर जिल्ह्यातून अटक केल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
यासंदर्भात पोलीसांना खबऱ्यांकडू मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलीसांनी बँक खातं हॅक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या या आरोपींना नालासोपारा इथल्या एका मॉलमधून अटक केली. अटक केलेल्यांमधला एक जण संबंधित बँकेचाच कर्मचारी असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.बी. कांबळे यांनी दिली आहे.