रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 मार्च 2024 (09:19 IST)

मोबाईलच्या स्फोटात ५ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

child death
जालना : चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चार्जिंगला लावलेला मोबाईल कानाला लावलात त्याचा स्फोट झाला यामध्ये ५ वर्षीय बालकाचा मृ्त्यू झाला. ही घटना जालनाच्या भोकरदन तालुक्यातील कुंभारी येथे सोमवारी सकाळी घडली. समर्थ परशुराम तायडे असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.
 
अधिकची माहिती अशी की, समर्थ परशुराम तायडे असे मयत बालकाचे नाव असून तो मूळचा संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोडचा होता. दरम्यान मामाच्या घरी आज आला असता सकाळी ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. भोकरदन तालुक्यातल्या कुंभारी येथे चार्जिंग लावलेल्या मोबाईल सोबत खेळत कानाला मोबाईल लावताच त्याचा स्फोट झाला होता. यामध्ये समर्थ तायडेचा मृत्यू झाला.
 
रुग्णालयात नेले असता डॉक्टरांकडून मृत घोषित
पोलिसांना मयताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ मुलांबरोबर खेळत असताना चार्जिंगला लावलेल्या मोबाईलजवळ गेला. त्यानंतर मोबाईल कानाला लावताच त्याचा स्फोट झाला यामुळे त्याच्या कानाला आणि हाताच्या बोटाला गंभीर इजा झाली. त्याला येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिर्का­यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

Edited by -Ratnadeep Ranshoor