रविवार, 17 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2023 (20:44 IST)

तर मराठा तरुणांचं फार मोठं नुकसान - विजय वडेट्टीवार

Vijay-Wadettiwar
राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन चांगलेच रान पेटले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरचा अंतिम अल्टिमेटम दिला आहे. मात्र जरांगे पाटील यांच्या सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला राज्यातील ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. यावरुनच कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
 
"मराठा समाजाला 10 टक्के ईडब्ल्यूस आरक्षणातून फायदा होत असेल, तर तो मोठा फायदा आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांना ईडब्ल्यूस आरक्षणापेक्षा राजकीय आरक्षणाचा फायदा घेण्याची भूमिका असावी. म्हणून ते आग्रही आहेत. मनोज जरांगे मराठा मुलांच्या भल्यासाठी आग्रही नाहीत, तर राजकीय फायद्यासाठी आग्रही आहेत," असा माझा त्यांच्यावर थेट आरोप आहे.. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
 
सरसकट कुणबी आरक्षणामुळे मराठा तरुणांचे नुकसान...
तसेच "सरसकट कुणबी आरक्षणाच्या मागणीमुळे मराठा तरुणांचे मोठे नुकसान होणार आहे. मराठा तरुणांनी याचा अभ्यास करावा. सर्व काही जरांगे पाटलांच्या म्हणण्याप्रमाणे ठरवू नये. अभ्यास करून त्यांच्या भविष्याचा निर्णय घ्यावा, असं माझं आवाहन असल्याचेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
 
दरम्यान, "दोन वर्ष शांत होते. गोळीबारानंतर मनोज जरांगे हे मराठा समाजाचे हिरो म्हणून पुढे आले. समाजाचे मोठे पाठबळ मिळाल्यामुळे ते सरकारला धमक्या देत आहेत, मात्र धमक्या देऊन प्रश्न सुटणार नाहीत, कोणत्याही गोष्टी कायद्याच्या चौकटीत बसून करायच्या असतात..." असेही विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले.  
 




Edited by- Ratnadeep Ranshoor