शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 मे 2024 (09:34 IST)

वकील आणि त्याच्या मुलाने मिळून केली वायुसेनाच्या माजी अधिकाऱ्याची हत्या

murder
महाराष्ट्रातील नागपूर मध्ये एक वाईट घटना घडली आहे. एका वकिलाने आपल्या मुलाला सोबत घेऊन वायुसेनेच्या माजी अधिकाऱ्याची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. घटना नागपूर मधील जरीपटका परिसरातील आहे. सांगितले जाते आहे दारू पिल्यानंतर यांच्यामध्ये वाद झाला व राग अनावर झाल्याने वकिलाने हे पाऊल उचलले.  
 
पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाली व दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी सांगितले की, मृतकाचे नाव हरीश दिवाकर कराडे आहे. ज्यांचे वय 60 वर्षे आहे. हे वायुसेना मध्ये प्रशासकीय सेवा रिटायर झाले होते. 
 
मिळालेल्या माहितीनुसार वकील हा दारू पिट असे. तसेच पोलिसांना प्राथमिक चौकशीमध्ये असे समजले की, दारू पिण्यावरूनच वकील आणि या अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता. या दरम्यान राग अनावर झालायने वकिलाने आपल्या मुलालाल सोबत घेऊन या माजी अधिकाऱ्याची हत्या केली. तसेच पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे व पुढील चौकशी नागपूर पोलीस करीत आहे. 

Edited By- Dhanashri Naik