गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जुलै 2022 (15:55 IST)

कोयनेच्या काठावर भूकंपाचे सौम्य धक्के, भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टर स्केल इतकी

कोयना परिसराला भूकंपाच सौम्य धक्का बसलाय… आज दुपारी एक वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपात कोणतेही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, कोयना धरणाला कोणताही धोका झालेला नाही. सातारा जिल्ह्यातील कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याची चर्चा होती. दरम्यान, कोयना धरण व्यवस्थापनाकडून सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.
 
व्यवस्थापनाने दिलेली माहिती अशी कि, शुक्रवार दिनांक २२ जुलै रोजी दुपारी १ वाजता कोयना धरण परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हदराला असून, या भूकंपाची महत्ता ३ रिष्टर स्केल इतकी होती, हा भूकंप संपूर्ण कोयना परिसरात जाणवला आहे. या भूकंपाची खोली ९ किलोमीटर इतकी होती. तर या भूकंपाचा केंद्र बिंदू कोयना खोऱ्यातील हेळवाक गावाच्या नैरूत्तेस ७ किलोमीटर अंतरावर होता.