सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 डिसेंबर 2022 (23:43 IST)

महिलेने मुलासह इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली

death
नवी मुंबईत कोपरखैरणे येथे सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून एका विवाहित महिलेने आपल्या 5 वर्षाच्या मुलाला घेऊन इमारतीच्या 7 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारात महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. 
 
आरती विजेंद्र मल्होत्रा असे या मयत महिलेचे नाव आहे. तर महिलेचा मुलगा अरविक हा गंभीर जखमी झाला आहे. सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचे समजले आहे. या प्रकरणी आरतीच्या सासरच्या मंडळी सासू, सासरे, नणंद आणि पतीच्या विरोधात तिचा छळ करून आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून  पतीला अटक केली आहे. 

मृतक आरतीचा विवाह कोपरखैरणे येथे राहणाऱ्या विजेंद्र मल्होत्राशी जानेवारी 2016 रोजी एका मॅट्रिमोनियल साईटवरून भेट होऊन झाला. लग्नाच्या काहीच दिवसानंतर आरतीचा सासरच्या मंडळींनी छळ करायला सुरु केले. तिला तिच्या मुलापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. सातच्या जाचाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले.
आपल्या 5 वर्षाच्या मुलाला घेऊन तिने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आरतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार आरतीच्या भावाने पोलिसात केली असता पोलिसांनी सासरच्या मंडळींचा विरोधात गुन्हा नोंदवून आरतीच्या पतीला अटक केली आहे. 
 
Edited By - Priya Dixit