सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 ऑगस्ट 2019 (15:20 IST)

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या कारचा भीषण अपघात

मराठीतील प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ मोठा अपघात झाला असून, सुदैवाने या अपघातातून ते थोडक्यात बचावले आहेत. पण त्यांचा चालक या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.
 
प्राथमिक माहितीनुसार, आनंद शिंदे यांचा मुलगा उत्कर्ष हा निवडणूक लढवणार आहे. या कारणामुळे ते आपल्या गावी निघाले होते. मात्र रात्री दोनच्या सुमारास इंदापूरजवळ वरकुटे येथे त्यांच्या गाडीला अपघात झाला. आनंद शिंदे यांच्या गाडीच्या चालकाला पुढे जाणारा डंपर दिसला नाही आणि त्यांच्या गाडीने डंपरला पाठीमागून जबर धडक दिली. या अपघातातून आनंद शिंदे थोडक्यात बचावले आहेत, पण गाडीचं मात्र मोठं नुकसान झाल आहे. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे, तर चालक गंभीर जखमी आहे. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.