बळजबरी करणाऱ्या खाजगी फायनान्स कंपन्यांवर कारवाई होणारच!
राज्यांत खाजगी फायनान्स कंपन्यांकडून वसूलीसाठी अनेक चुकीचे मार्ग अवलंबले जात आहेत. ही बाब अतिशय चुकीची असुन याबाबतीत महाराष्ट्र सरकार कारवाई करणार असल्याचे आश्वासन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ह्यांनी दिलंय.
काय म्हणाले शंभूराज देसाई?
कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या फायनान्स कंपन्यांच्या विरोधातील आंदोलनाबाबत कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्यांना दिले जातील. जर, ह्या चौकशीमध्ये संबंधित कंपनी दोषी आढळली तर, त्या कंपनीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.