सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 जानेवारी 2023 (08:14 IST)

शरद पवार यांच्या पाठोपाठ आता रोहित पवार यांची क्रिकेटच्या मैदानात दमदार एंट्री

rohit pawar
शरद पवार आणि क्रिकेट हा इतिहास देशातील सर्वांनाच ज्ञात आहे. अशामध्ये आता त्यांचे नातू रोहित पवार यांनीदेखील क्रिकेटच्या मैदानात प्रवेश केला आहे. आधी महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनवर रोहित पवार यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांची असोशिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
आजोबा शरद पवार यांच्या पाठोपाठ आता रोहित पवार यांची क्रिकेटच्या मैदानात दमदार एंट्री झाली आहे. आज असोशिएशनच्या कमिटीची बैठक पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये पार पडली. यामध्ये त्यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या १६ सदस्याच्या कमिटीमध्ये रोहित पवार यांचीदेखील निवड झाली होती
Edited by : Ratnadeep Ranshoor