बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 28 नोव्हेंबर 2021 (11:46 IST)

ठाकरे सरकार ची दोन वर्षे पूर्ण, मुख्यमंत्रीनी जनतेचे आभार मानले

उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस अशा तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचा प्रयोग सत्तेत येण्याला 2 वर्षे पूर्ण होत आहेत.
सलग तीन दशकं भाजपाबरोबर युतीत राहाणाऱ्या तसेच भाजपाबरोबर राज्यात स्थापन करणाऱ्या शिवसेनेने निवडणुकीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेऊन सर्वांनाच धक्का दिला. 
राज्यावर आलेल्या असंख्य आव्हानांना सामोरी जाऊन राज्यातील महाविकास आघाडी सरकारंने आपल्या सत्तेचा दोनवर्षाचा कालावधी पूर्ण केला .कोरोना महामारीचं संकट  असो किंवा नैसर्गिक संकट असो. सर्व मोठ्या संकटाना तोंड देत ठाकरे सरकारने आपली दोन वर्षे पूर्ण केली. किती ही संकटे आली तरीही जनतेची  सुरक्षा आणि भलेसाठी मी त्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे. आणि जनतेच्या भलेचे  काम  सातत्याने सुरूच राहील. जनतेने माझ्यावर केलेल्या विश्वासासाठी  मी जनतेचे आभारी राहीन. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 
त्यांनी कोरोनाच्या लढ्यात ज्यांनी सहकार्य केले आहे. त्यांचे देखील कौतुक करून आभार मानले आहे .शासन आणि प्रशासनाने उद्योग, गुंतवणूक, शेती, सर्वसामान्यांना घरे, रोजगार, पाणीपुरवठा, सौर ऊर्जा, पर्यावरण, पर्यटन, वने अशा प्रत्येक विभागांनी या संपूर्ण काळात सर्वसामान्यांना प्रत्यक्ष लाभ कसा मिळेल, यासाठी भरपूर मेहनत घेतली. नवनवीन योजना नुसत्या आणल्याच नाहीत तर राबवून दाखवल्या. देशाला दिशादर्शक असे इलेक्ट्रिक वाहन धोरण आणले. पर्यटन व्यवसायात रोजगाराच्या संधी निर्माण करून या क्षेत्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास आणला. तसेच तरुणांना वेगवेगळ्या कौशल्यात पारंगत करून त्यांना रोजगाराच्या संधी मिळवून दिल्या. कोव्हीड काळात निराधार झाल्यानं राज्य सरकारने मदतीचा हात दिला. ठाकरे सरकारने जनतेच्या भलेसाठी जे काही काम केले आहे तसेच पुढेही करत राहतील. आपले प्रेम आणि विश्वास आमच्या वर असेच कायम ठेवावे अशी अपेक्षा जनते कडून आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले.