शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 जुलै 2023 (07:48 IST)

अजित पवार यांच्या बंडाचा आज फैसला

ajit panwar
Ajit Pawars rebellion verdict today अजित पवार यांनी पक्ष नेतृत्वाला आव्हान देऊन भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. किती आमदार आपल्या पाठीशी आहेत हे सांगण्याचे त्यांनी आतापर्यंत टाळले असले तरी दोन तृतीयांशपेक्षा अधिक आमदार त्यांच्याकडे असल्याचे सांगितले जात आहे. परंतु शपथविधीला हजर असलेल्या काही आमदारांनी नंतर भूमिका बदलल्याने अनिश्चितता आहे. अशा स्थितीत उद्या अजित पवारांच्या बंडाचा फैसला होणार आहे.अजित पवार यांच्याकडे ४१ पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा आहे तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शपथ घेतलेले ९ आमदार वगळता सर्व आमदार पक्षासोबत असल्याचा दावा केला आहे.
 
सुप्रिया सुळेंचेही आवाहन
महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेने आदरणीय पवार साहेबांवर नेहमीच जीवापाड प्रेम केले आहे आणि साहेबांचादेखील इथल्या जनतेवर जीव आहे. हे नाते अतूट आणि पहाडासारखे भक्कम आहे. प्राप्त परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसला पुढील दिशा देण्यासाठी ८३ वर्षांचा तरुण योद्धा म्हणजेच आपले सर्वांचे आदरणीय पवारसाहेब उद्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला आपण सर्वांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे, असे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.