मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (08:07 IST)

शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच अमोल कोल्हेंनी घेतली संजय राऊतांची भेट; ट्वीट करत म्हणाले

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीबाबत ट्विट केले आहे. दिल्लीत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेषणादरम्यान ही भेट झाल्याचे बोलल्या जात आहे. शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच अमोल कोल्हे आणि संजय राऊत एकत्र पहायला मिळाले. दरम्यान, संजय राऊत यांची भेट पर्वणी असल्याचे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी कडून अमोल कोल्हे यांना लोकसभा निवडणुकीसाठी शिरुर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे आढळराव पाटील यांचा पराभव करत निवडणूक जिंकली होती.
 
संजय राऊत यांच्या भेटीबाबत कोल्हे म्हणाले, “शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट झाली.त्यांची भेट ही नेहमीच पर्वणी असते.महाविकास आघाडी, मतदारसंघातील प्रकल्प अशा अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा करता आली. मतदारसंघात ‘महाविकास आघाडी’ म्हणून काम करताना राऊत साहेबांनी केलेल्या मार्गदर्शनाचा नक्कीच लाभ होइल.” यापुर्वी खासदार अमोल कोल्हे यांनी स्थानिक पातळीवर होणाऱ्या राजकारणावरून शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं होतं. शिरूर लोकसभा मतदार संघातील पुणे ते नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वरील नारायण गाव बाह्यवळण रस्त्याचं उद्घाटन खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आलं.यावेळी अनेक राजकीय चर्चांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला होता.यावेळी त्यांनी माजी खासदार आणि शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली होती.