गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 डिसेंबर 2020 (17:04 IST)

आणि नवदाम्पत्यांला शरद पवारांनी दिले शुभ आशिर्वाद

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार भारत भालके यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नियोजित दौरा पंढरपुरात सुरू आहे. यादरम्यान सरकोली या गावी जाण्यासाठी ताफा निघालेला असतानाच तो थांबवून त्यांनी नवविवाहित वधूवरांना शुभ आशीर्वाद दिला. 
 
गादेगाव (ता. पंढरपूर) येथील सुरज नवनाथ शिंदे व उरळी कांचन (पुणे) येथील काजल हरी क्षिरसागर यांचा कालच गादेगाव येथे विवाह सोहळा पार पडला. त्यामुळे हे नवदांपत्य ग्रामदैवत दर्शनाला जात होते. भक्तिमार्गावर हे दांपत्य दिसल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला ताफा उभा करून नव वधू-वरांना शुभ अशिर्वाद दिले. त्यानंतर ते आपल्या नियोजित दौऱ्याकडे मार्गस्थ झाले. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार यशवंत माने, दीपक आबा साळुंखे पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते पदाधिकारी उपस्थित होते.