शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019 (15:55 IST)

आणि शरद पवार चांगलेच संतापले

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्रकाराकडून पद्मसिंह पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता आणि नातेवाईक असा उल्लेख केला असता ते चांगलेच संतापले. श्रीरामपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना एका पत्रकाराने शरद पवार यांना पद्मसिंह पाटील जे तुमचे नातेवाईक आहे तेही तुमची साथ सोडून जाण्याच्या तयारीत आहेत असं कळतं आहे असं पत्रकाराने विचारताच शरद पवार चांगलेच संतापले. राजकारणात नातेवाईकांचा काय संबंध? तुम्ही चुकीचं बोलत आहात, असं बोलणार असाल तर मला या पत्रकार परिषदेला कशाला बोलवायचं? माफी मागा, राजकारण आणि नातेवाईक यांचा काय संबंध? असा प्रश्न शरद पवारांनी विचारला आणि ते पत्रकार परिषद सोडून जाऊ लागले. इतक्यात त्यांना इतर पत्रकारांनी बसवलं आणि प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला शांत बसण्यास सांगितलं.