शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 (21:19 IST)

औरंगाबाद: बाप्परे, खिडकीतून डोक बाहेर काढण शाळकरी मुलाच्या जीवावर बेतलं

औरंगाबादमध्ये खिडकीमधून डोक बाहेर काढणे शाळकरी मुलाच्या जीवावर बेतलं आहे. ड्रायव्हर बस मागे घेत असताना शाळकरी मुलाने बसच्या खिडकीतून डाेकं बाहेर काढलं. त्यामुळे एका मोठ्या खांबाला त्याचे डोकं आपटलं. त्याच्या डोक्याला जबर लागला. तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ रुगणालयात हलविण्यात आले मात्र रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
 
घटनेची सविस्तर माहिती अशी की, या दुर्देवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव ओंकारेश्वर पंडित आहे. औरंगपुरा ते साजापूर या मार्गावर धावणा-या औरंगाबाद महानगरपालिकेची सिटी बसमधून ओंकारेश्वर प्रवास करीत हाेता. ताे बसच्या मागील सीटवर बसलेला होता. ड्रायव्हर बस मागे घेत असताना दुर्दैवाने ओंकारेश्वरने खिडकीतून डाेकं बाहेर काढलं. त्यामुळे एका मोठ्या खांबाला त्याचे डोकं आपटलं. त्यामुळे त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्यात तो गंभीर जखमी झाला होता.
 
बस चालकाला अपघात झाल्याचे लक्षात येताच त्याने बस थांबवली. त्यानंतर मुलाला रिक्षात टाकून घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचारावेळी ओंकारेश्वरचा मृत्यू झाला. ताे येथील एसबी शाळेत इयत्ता नववीत हाेता. 

Edited By - Ratandeep Ranshoor