गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 एप्रिल 2024 (12:11 IST)

बीड : ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन तरुणाचा जागीच मृत्यू

accident
बीडच्या तलवाडा गावात ट्रक आणि दुचाकीची जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.हा अपघात सीसीटीव्ही केमेऱ्यात कैद झाला आहे. 
सदर घटना बीडच्या गेवराई तालुक्यात तलवाडा गावात घडली असून दुचाकीस्वारला भरधाव येणाऱ्या एका ट्रॅकने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. युनूस शेख असे या मयत तरुणाचे नाव आहे. 
अपघातानंतर ट्रक चालकाने पसार होण्याचा प्रयत्न केला मात्र जमावाने त्याला पकडलं. पोलिसांनी या प्रकरणात ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.
ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या मध्ये भरधाव रस्त्यावरून दुचाकी जात असताना एका ट्रक ने दुचाकीस्वाराला धडक दिली, या मध्ये दुचाकीस्वार खाली पडून त्याचा मृत्यू झाला. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बीड पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

Edited by - Priya Dixit