सोमवार, 11 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 28 ऑगस्ट 2022 (17:32 IST)

बीड :कार– दुचाकीचा भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

accident
बीड परळी महामार्गावर मौज गावाजवळ कार आणि दुचाकीच्या अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीड -परळी महामार्गावर माजलगाव येथून येणाऱ्या कार आणि बीड कडून वनवणी कडे जाणाऱ्या एका दुचाकीत जोरदार धडक झाली या मध्ये कारचा समोरून चक्काचूर झाला आणि दुचाकी दूरवर फेकली गेली या अपघातात दुचाकीवर बसलेले दोघे जागीच ठार झाले.  ही धडक एवढी भीषण होती की दुचाकीस्वार पैकी एक कारचा खाली चिरडला गेला आणि दुसरा दूरवर फेकला गेला. त्यांच्या बद्दल माहिती अद्याप मिळू शकली नाही.