सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 जुलै 2022 (21:35 IST)

उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय, महाराष्ट्र दौरा करणार

uddhav thackeray
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी पक्षाला नवी भरारी देण्यासाठी आणि शिंदे गटाला आव्हान देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठ्या प्रमाणात राजकीय नुकसान झालंय. संघटनात्मक पातळीवरही पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. त्यामुळे पक्षाला नवसंजीवनी  देण्यासाठी उद्धव यांनी महाराष्ट्र दौरा करणार असल्याची घोषणा केली आहे.
उद्धव ठाकरे हाराष्ट्र दौऱ्यात पक्षाला मजबुत करण्यासाठी थेट रस्त्यावर उतरणार आहेत. संघटनात्मक पातळीवर  कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या बैठका आणि मेळावेही घेणार आहेत.