शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 डिसेंबर 2022 (22:03 IST)

मालेगावमध्ये भाजपचे आंदोलन; पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा, बिलावल बुट्टोच्या पुतळ्याचे दहन

मालेगाव – पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल बुट्टोने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याचे देशभर उमटले. मालेगावमध्येही भाजपने आंदोलन करुन आपला संताप व्यक्त केला. महात्मा गांधी पुतळा येथे भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या मार्गदर्शनात व मनपा गटनेते सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वात मोसम पूल येथे निषेध प्रदर्शन करण्यात आले. यावेळी पाकिस्तान परराष्ट्र मंत्री बिलावल बुट्टो याच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. बुट्टो यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. तसेच आंदोलकांनी पाकिस्तान मुर्दाबाद, बिलावल बुट्टोचा निषेध असो अशा घोषणा दिल्या.
 
यावेळी मनपा गटनेते सुनील गायकवाड यांनी आपल्या भाषणात म्हटले की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे जागतिक प्रश्न सोडविण्यात अग्रेसर राहिले असून त्यांची जागतिक वाढती लोकप्रियता बघून पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली असून पाकिस्तानची आर्थिक वाताहात होत आहे. पाकिस्तान एअरस्ट्राईक विसरले असतील तर त्यांना त्यांची जागा दाखविण्याचे काम केले जाईल. प्रधानमंत्री आमचे आशास्थान असून त्यांची तुलना लादेन सोबत बिलावल बुट्टो याने केली असून करून आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो.
 
यावेळी संघटन सरचिटणीस देवा पाटील म्हटले की मोदी हे कुठल्या विशिष्ट पक्षाचे नसून भारताच्या सर्व जनतेचे पंतप्रधान आहे त्यांचा अपमान म्हणजेच अखंड भारताचा अपमान आहे. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष यांनी देखील निषेधपर भाषण केले. या आंदोलनात सुनील गायकवाड, देवा पाटील, मदन गायकवाड, दादा जाधव,  स्वप्नील भदाणे, शक्ती सौदे, आप्पा साबणे, रंजत सोनवणे, राजेश वाजपेयी, पप्पू पुरकर, युवराज गीते, विरु देवरे, दीपक पवार, महावीर जैन आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Edited by : Ratnadeep Ranshoor