शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 29 ऑगस्ट 2021 (10:45 IST)

'2024 मध्ये भाजप आणि रिपब्लिकन पक्षाचे सरकार येणार'- रामदास आठवले

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कितीही कारस्थान केले तरी त्यांना कोणीही अडवू शकणार नाही. 2024 मध्ये भाजप आणि रिपब्लिकन पक्षाचे सरकार येणार," असं वक्तव्य रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी वर्तवलं आहे.
 
राज्यात भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येत सत्ता स्थापन करण्याचा विचार होत असल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती करण्याचा विचार करावा,असाही सल्ला आठवलेंनी दिला आहे.
 
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत यासंदर्भात चर्चा झाली असेल,असंही ते म्हणाले आहेत.
ओबीसी राजकीय आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत,असं मत आठवलेंनी व्यक्त केलं.यासंदर्भात राज्य सरकारच्या 'सह्याद्री' अतिथिगृह येथे झालेल्या बैठकीत रिपब्लिकन पक्षाला निमंत्रण दिलं नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.