गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 फेब्रुवारी 2019 (09:37 IST)

भाजप नगरसेविकाने पालिका आयुक्तांच्या अंगावर बांगड्या फेकल्या

अनधिकृत बांधकामाबाबत वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या भाजप नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्यावर बांगड्या फेकल्या, त्यामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली होती. कल्याण -डोंबिवली महापालिकेच्या महासभेत हा प्रकार घडला आहे. प्रमिला चौधरी यांनी त्यांच्या प्रभागात होत असणाऱ्या अनधिकृत बांधकामाबाबत त्यांनी नगररचना विभागाकडे नेहमीच तक्रार दिली होती. त्यातही, २ वर्षे सतत पाठपुरावा करूनही नगररचना विभाग केलेल्या तक्रारींवर कारवाई करत नसल्याने महासभेत त्यांनी याप्रकरणी सभा तहकुबी मांडली होती. मात्र तासभर चर्चा होऊनही आयुक्त याप्रकरणी कोणतीही ठोस भूमिका जाहीर केली नाही असे सांगत भाजप नगरसेविका चौधरी संतप्त झाल्या होत्या, त्यांनी आपली जागा सोडून थेट नगररचना अधिकाऱ्यांसमोर गेल्या आणि हातातील बांगड्या त्यांच्यासमोर टेबलावर आदळल्या. यानंतर थेट महापालिका आयुक्तांच्या टेबलसमोर येऊन त्यांनी हातातून आणखी बांगड्या काढल्या आणि पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्यावर भिरकावल्या. त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला होता. अयावर पिठासीन अधिकाऱ्यांनी गोंधळ पाहून सभा लेगेच तहकूब केली.