सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 जानेवारी 2023 (21:50 IST)

चित्रा वाघ यांना भाजपचं समर्थन नव्हतं? बावनकुळेंनी सांगितलं राजकारण

chandrashekhar bawankule
उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद चांगलाच रंगला होता. उर्फीच्या बोल्ड कपड्यांवरून सुरू झालेला वाद महिला आयोगापर्यंत गेला. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेत तिच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. यानंतर मुंबई पोलिसांकडून उर्फीला नोटीस पाठवण्यात आली होती. यासोबतच मुंबई पोलीस आयुक्तांनीही चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, महिला आयोगाकडून चित्रा वाघ यांनाच नोटीस बजावण्यात आली.
 
चित्रा वाघ यांच्या पाठिशी पक्ष खंबीरपणे उभा राहिला नसल्याचीही चर्चा रंगली. यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
 
उर्फी जावेदच्या तक्रारीची दखल घेत रुपाली चाकणकर यांनी मुंबई पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 'मुक्त संचाराचा हक्क घटनेने प्रत्येक भारतीयाला दिला आहे, महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात असुरक्षित वाटणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी यावर तात्काळ कारवाई करावी व केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करावा.' असे ट्वीटमध्ये नमूद करण्यात आले होते. त्यामुळे, याप्रकरणात चित्रा वाघ यांच्या पाठिशी भाजप समर्थपणे उभा राहिला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यासंदर्भात चंद्रशेखर
 
बावनकुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
 
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज जालना जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी उर्फी जावेद प्रकरणात चित्रा वाघ यांना भाजपचे समर्थन नसल्याने त्या कमी पडल्या का? असा पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर, भाजपात समर्थक किंवा बेसमर्थक असं काही नाही. चित्रा वाघ यांनी त्यांची भूमिका मांडली आहे, ज्या विषयांवर त्यांनी भूमिका मांडली त्यांवर बोलायला त्या सक्षम असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं.
Edited by : Ratnadeep Ranshoor