1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 16 जानेवारी 2023 (14:45 IST)

मी पूर्ण कपड्यात फिरते, बाकीच्यांचे मला माहित नाही--शर्मिला ठाकरे

sharmila thackare
भाजप नेत्या चित्रा वाघ  आणि उर्फी जावेद यांच्यातील वाद अजुनही सुरुच आहे त्यात आता शर्मिला ठाकरे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. उर्फीच्या कपड्यांवर शर्मिला ठाकरे यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे.
 
नवी मुंबईतील एका कार्यक्रमात शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारले. उर्फीच्या कपडे घालण्याच्या स्टाईलवर तुमची प्रतिक्रिया काय असे पत्रकारांनी विचारले असता राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दोन वाक्यात अगदी मिश्कील पण जबरदस्त प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, 'मी पूर्ण कपड्यात फिरते. बाकीच्यांचे मला माहित नाही.' असं उत्तर देऊन त्या लगेच निघून गेल्या.
 
उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद काही थांबण्याचे नाव घेत नाही. उर्फीवरुन तर आता राजकारणही तापले आहे. 'उर्फी ला बेड्या ठोका, महिला आयोगाने आत्तापर्यंत काहीच कसे केले नाही' अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. तर दुसरीकडे उर्फीनेच महिला आयोगाकडे चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार केली आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor