शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 13 सप्टेंबर 2020 (09:04 IST)

आमदारसाहेबांच्या स्वागतासाठी चक्क १०० पोती फुलांचा वर्षाव

भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर कोरोनामुक्त झाल्यानंतर पडळकर यांच्यावर चक्क जेसीबीतून फुलांचा वर्षाव करण्यात आला आहे. गोपीचंद पडळकर हे पंढरपूर येथील एका रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर आज (१२सप्टेंबर) पडळकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर  त्यांच्या स्वागतासाठी चक्क १०० पोती फुलांचा वर्षाव करण्यात आला आहे.
 
कोरोनामुक्त झाल्यानंतर पंढरपुरातील रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर गोपीचंद पडळकरांच्या शेकडो समर्थकांनी जेसीबीमधून त्यांच्यावर गुलाब, झेंडू, निशिगंध, शेवंती अशा 100 पोती भरून फुलांचा वर्षाव केला.राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशीच पडळकर कोरोना पॉझिटिव्ह  आले.