गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 फेब्रुवारी 2018 (15:52 IST)

छिंदम नंतर आता दिलीप गांधी अडचणीत, गुन्हा दाखल करण्याचे आदेश

अहमदनगर सध्या चर्चेचा विषय झाले आहे. यामध्ये भाजपा पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी चर्चेत आहेत. आता भाजपचे नगरचे खासदार दिलीप गांधी यांच्यासह त्यांचे पुत्र नगरसेवक सुवेंद्र गांधी, पवन गांधी, सचिन गायकवाड यांच्यावर  औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशनुसार शनिवारी  खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोर्ड शोरुमचे मालक भूषण बिहाणी यांनी  दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
खासदार गांधी यांच्यासह चार जणांविरोधात औरंगाबाद खंडपीठाने  गुन्हा दाखल करण्याचे आदेश शुक्रवारी दिले होते.  या गुन्हाचा तपास सीआयडीकडे वर्ग करावा, असेही औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे.  बिहाणी यांना २९ सप्टेंबर २०१५ रोजी  खंडणी मागितली गेल्याचे बिहाणी यांचे म्हणणे आहे. दिलीप गांधी यांच्या मुलाने बंदुकीचा धाक दाखवून वेळोवेळी पैशाची मागणी केली आहे. यामध्ये त्याने जवळपास ५० लाख रुपयांची खडणी घेतली आहे.  या प्रकरणातील सर्व फोन रेकोर्ड  पोलिसांना दिले आहेत . या चार ही जनांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे आता दिलीप गांधी यांनी राजीनामा दयावा अशी मागणी करण्यात   येत आहे.