शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 ऑक्टोबर 2019 (10:24 IST)

राज्यात बीएसएनलकडून सहाशे पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना सक्तीची व्ही आरएस

देशातच आर्थिक संकटात असलेल्या बीएसएनलकडून कर्मचाऱ्यांना व्हीआरएस देऊन कर्मचारी कपात करण्याची शक्यता आहे. नाशिक येथील विभागीय कार्मयालयातील जवळपास साडेसहाशे कर्मचाऱ्यांना व्हीआरएस मिळण्याची दाट शक्यता सूत्रानी वर्तवली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सुमारे बीएसएनलचे ९५० कर्मचारी, अधिकारी कामकाज पाहतात. तरी  सध्यस्थिती तीनशे ते साडेतीनशे कर्मचाऱ्यांवरही जिल्ह्यातील विविध केंद्रांचे कामकाज होवू अश्क्ते असे  नाशिक महाव्यवस्थापक नितीन महाजन यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील सुमारे सहाशे ते साडेसहाशे कर्मचाऱ्यांना व्हीआरएस मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील विविध केंद्रावरील सुरक्षा रक्षक आणि अन्य खर्चात बीएसएनएलने आगोदरच मोठी कपात केली होती. आता त्यात नव्याने मोठ्या प्रमाणात  कर्मचारी कपातीची भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
 
देशात आर्थिक संकटात सापडलेल्या बीसएनएलकडून( भारत संचार निगम लिमिटेड) अस्तित्व  टिकवायला कर्मचारी कपातीसाठी स्वेच्छा निवृत्ती योजना (व्हीआरएस) आणि फोर जी स्पेट्रकमला परवानगी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहे. या माध्यमातून संकट स्थितीवरही मात करून बीएसएसएल दुर्गम भागातील परवडणार्‍या या सेवेसह देशातील आपात्कालीन स्थितीतही सेवा सुरूच ठेणार असल्याची बीएसएनलचे महाव्यवस्थापक संजय कुमार सिन्हा यांनी सांगितले आहे.
 
बीएसएनएलला आर्थिक सहकार्यासाठी केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाने परवानगी दिली असून, बंद करण्याचा सल्ला दिल्याने बीएसएनल बंद होण्याच्या चर्चां सुरु झाल्या आहेत. त्यातच बीएसएनलचे मुख्य महाव्यवस्थापक संजयकुमार सिन्हा यांनी प्रसिद्धपत्रकाच्या माध्यमातून बीएसएनल बंद होणार नसल्याचा खुला केला आहे.
 
बीएसएनल पुन्हा जोमाने सुरु करायला कर्मचार्‍यांना व्हीआरएस देण्यासोबतच आणि फोर जी स्पेक्ट्रमला परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सिन्हा यांनी प्रसिद्धी पत्रकातून सांगितले आहे. त्यासोबच बीएसएनएलकडे उपलब्ध असलेल्या मालमत्तांचे मॉनिटरेशन करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन असून यामाध्यमातू आर्थिक पाठबळ उभे करून नैसर्गिक आपत्तीच्या कठीण काळात आणि अगदी दुर्गम ठिकाणीही परवडणारी सेवा बीएसएनएलक डून सुरूच ठेवली जाणार असल्याचे सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कंपनीत मोठी खळबळ उडाली असून अनेकांना नारळ मिळणार आहे.