शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 मार्च 2022 (12:18 IST)

BSNL च्या गोदामाला आग; केबल जळून लक्षावधी रुपयांची हानी

खामगावच्या एमआयडीसी पारखेड शिवारात बीएसएनएलच्या गोदामात शनिवारी सकाळी लागलेल्या आगीत केबल जळून लक्षावधी रुपयांचे नुकसान झाले आहेत. सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीने उग्ररूप धारण केले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली आहे. या आगीत केबल आणि इतर साहित्य जळाल्याने मोठ्या प्रमाणात लक्षावधी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगीचे लोट दूरवर लोटले होते. आगीची माहिती मिळतातच अग्निशमन दलाचे दोन बंब हजार होते. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहे. पोलीस देखील घटनास्थळी तातडीने पोहोचली.