सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जुलै 2023 (12:35 IST)

buldhana : 55 प्रवाशांनी भरलेली बस बुलढाण्याच्या घाटात पलटली

मलकापूर -बुलढाणा एसटी बसचा मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. बसचे ब्रेकफेल झाल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस राजुरा घाटात पलटली आणि हा अपघात झाला. या बसमध्ये 20 शाळकरी विद्यार्थ्यांसह एकूण 55 प्रवासी होते. बस मालकापूरहून बुलढाण्याकडे निघाली होती. 
 
बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे बसचालकाचे नियंत्रण सुटून बस राजूरा घाटात पलटली. या अपघातात 2 जण जखमी झाले आहे. 

अपघाताची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात रुग्णालयात पाठविले आहे. जखमींवर उपचार सुरु आहे. 
 
Edited by - Priya Dixit