शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 मार्च 2024 (08:58 IST)

परिवारवादातून चालणारे विरोधी पक्ष हे लोकशाही मजबूत करू शकतात का? --अमित शाह

अमित शाह महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा महत्वाचा आहे. या दौऱ्यात अमित शाह यांची जळगावमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी राज्यातील महाविकास आघाडीवर अमित शाह यांनी जोरदार हल्लाबोल केला. राज्यात ३ चाकाची महाविकास आघाडीची ऑटो चालते, तिचे तिन्ही टायर पंक्चर झाले आहेत, असे अमित शाह म्हणाले.भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जळगाव येथील जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
 
अमित शाह यांनी घराणेशाहीवरुन सोनिया गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरेंना आपला मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे, शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं आहे, असे म्हणत परिवारवादातून चालणारे विरोधी पक्ष हे लोकशाही मजबूत करू शकतात का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित युवकांना केला.

विरोधक त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री करण्यासाठी झटत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तुमच्या भविष्यासाठी झटत असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. राज्यात ३ चाकाची महाविकास आघाडीची ऑटो चालते, तिचे तिन्ही टायर पंक्चर झाले आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले काम करत आहेत. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविधा दिल्या. १ लाख मुलं डॉक्टर बनतील, असे अमित शाह म्हणाले.
 
आत्मनिर्भर आणि विकसित भारताचा निर्धार या निमित्ताने भाजपाकडून करण्यात येत आहे. भारत मातेला विश्वगुरुच्या स्थानावर पोचहविण्यासाठी भाजपाला साथ देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित युवकांना केले. परिवारवादातून चालणारे विरोधी पक्ष हे लोकशाही मजबूत करू शकतात का? असा प्रश्न त्यांनी युवकांना केला.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor