रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 फेब्रुवारी 2022 (21:20 IST)

आरोपांना उत्तर देऊ शकत नाही म्हणून थेट गुंडागर्दीवर उतरायचे?

भाजपा नेते किरीट सोमय्या यांना आज पुण्यात महापालिकेच्या आवारात शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
 
“राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? आरोपांना उत्तर देऊ शकत नाही म्हणून थेट गुंडागर्दीवर उतरायचे? आम्ही कायदा पाळतो. पण याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही! महाराष्ट्रात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध!” असं देवेंद्र फडणवीस ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.