1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified रविवार, 20 नोव्हेंबर 2022 (10:09 IST)

शिवरायांनी औरंगजेबाकडे 5 वेळा माफी मागितली होती, भाजप नेताचे वादग्रस्त वक्तव्य

राहुल गांधी यांनी वि. दा. सावरकर यांच्या माफीनाम्यावरून आरोप केल्यानंतर राजकीय वाद पेटला आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी एक वादग्रस्त दावा केला आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाचवेळा पत्र लिहून माफी मागितली होती. त्यावेळी अनेकजण राजकीय समस्यांतून बाहेर येण्यासाठी माफीनामा लिहित होते, असं त्रिवेदी यांनी म्हटलं.
 
त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला.
 
शिवाजी महाराजांनी 5 वेळा औरंगजेबाची पत्र लिहून माफी मागितली होती, असं म्हणणारा ठार वेडाच असू शकतो, असं आव्हाड म्हणाले.
 
या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला.
 
Published By -Priya Dixit