चंद्रकांत पाटील यांचे सुप्रिया सुळे यांना जोरदार प्रत्युत्तर
गणेशोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील अनेक मंडपातील गणेशाचे दर्शन घेतले. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. राज्याच्या विविध मंडळातील गणेश मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्र्यानी गणेश मंडळांना दिलेल्या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याला दोन मुख्यमंत्री पाहिजे असा टोला लगावला यावरून त्यांच्या टोमण्याला उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले 'अतिशय व्यवस्थित प्रशासन सुरू आहे. तुम्ही तर घराच्या बाहेरच पडत नव्हत्या. सुप्रिया ताई तुम्ही काळजी करू नका. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे फिरतील देखील आणि सरकार देखील चालवतील. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवदीप शैक्षणिक संस्थेच्या वतीने परिसरातील किर्तनकारांचा जाहीर सत्कार सोहळा या कार्यक्रमात आले होते.या कार्यक्रमादरम्यान, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यामांशी संवाद साधला.