सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 एप्रिल 2023 (08:11 IST)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल, विरोधकांचा दावा; श्रीकांत शिंदे म्हणाले

eknath shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मुळ गावी यात्रेसाठी आले आहेत. मात्र विरोधक सकाळ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत टीकाच करतात अशी प्रतिक्रिया ठाण्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. आज कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावचा दोन दिवस दौरा केला. या दौऱ्या दरम्यान राजकीय चर्चांना उधाण आलं. विरोधकांनी मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेमुळ मुख्यमंत्री शिंदे दोन दिवस नॉट रिचेबल असल्याचा दावा केला, यानंतर आज कोल्हापूर दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
 
अजित पवार मुख्यमंत्री होणार असे बॅनर काही दिवसापूर्वी झळकले होते. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, बॅनर लावल्याने जर मुख्यमंत्री झाले असते तर सगळ्यांनीच बॅनर लावले असते. मुख्यमंत्री झाल्यावर जे काम करावं लागतं ते गेल्या 10 महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून दिलं आहे.तळागाळातील व्यक्तीसाठी वेगळे निकष लावून त्य़ांच्य़ासाठी काम केलेलं आहे. योजना आणि यंत्रणा कशा राबवल्या पाहिजेत हे देखील दाखवून दिलं आहे, असेही शिंदे म्हणाले.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor