शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 4 फेब्रुवारी 2024 (11:14 IST)

मुंबईत मराठा समाज खुल्या वर्गांचे सर्वेक्षण पूर्ण

राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मुंबईमध्ये 23 जानेवारीपासून मराठा तसेच खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरु करण्यांत आले होते. नुकतेच हे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील 38 लाख 79 हजार 46 इतक्या घरांचे सर्वेक्षण करण्याकरिता 30 हजार कर्मचारी कार्यरत होते. सर्वेक्षणाचे उद्दिष्ट गाठत 1 फेब्रुवारी रोजी मुंबईतील मराठा/खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यांत आले, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.
 
राज्य मागासवर्ग आयोगाने पाठविलेल्या ‘मास्टर ट्रेनर’ने मुंबई महापालिकेतील नोडल ऑफीसर, असिस्टंट नोडल ऑफीसर व मास्टर ट्रेनर यांनी महापालिकेच्या कर्मचारी वर्गाला सर्वेक्षणासाठीचे प्रशिक्षण दिले होते. तसेच सर्वेक्षणासाठी खास अत्याधुनिक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले होते. सर्वेक्षणादरम्यान एकूण 160 ते 182 प्रश्न असून मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची माहिती प्रश्नावलीद्वारे भरुन घेण्यात आली. सदर माहिती मुलभूत, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, आरोग्य विषयक होती. कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्याची माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाची पुढील माहिती घेण्यात आली नाही.

Edited by -Ratnadeep Ranshoor