बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जानेवारी 2022 (08:16 IST)

मालेगाव दंगलीतील वादग्रस्त व्हिडिओ प्रकरण, न्यायालयात आरोपपत्र दाखल

मालेगाव दंगलीतील  वादग्रस्त व्हिडिओप्रकरणी अखेर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी जियाऊर रहेमान जाविद अहमद आणि अम्मार शफिक अहमद अन्सारी हे संशयित आरोपी आहेत. याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल असून, चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यात जियाऊर रहेमान जाविद अहमद आणि अम्मार शफिक अहमद अन्सारी यांचाही समावेश होता. मालेगाव दंगल प्रकरणी दाखल झालेले हे दुसरे आरोपपत्र आहे.
 
मालेगावमध्ये झालेला हिंसाचार हा सुनियोजित होता, असे पुढे येत आहे. नगरसेवक अयाज हलचलने एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यात त्रिपुरा येथे मुस्लिम नागरिकांवर अन्याय होत आहे. तिथले दंगे रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे म्हणत ती क्लिप इतर चौघांच्या मदतीने वेगवेगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड केली. 8 नोव्हेंबरला हा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी नगरसेवक अयाज हलचलसह 4 बेड्या ठोकल्या असून, इतर 42 जणांवर कारवाई केली आहे.
 
मालेगाव दंगलीप्रकरणी आमदार मौलाना मुफ्ती यांनी रजा अकॅडमीवर आरोप केले होते. दंगलीप्रकरणी अटक केलेला एक नगरसेवक हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. एक संशयित नगरसेवक जनता दलाचा आहे. मुंबईतून रजा अकादमीच्या काही लोकांना पैसे वाटले. दंगलीच्या एकदिवस अगोदरच्या रात्री दंगेखोरांनी दगड आणून ठेवले होते. वीस वर्षांपासून मालेगाव शांत आहे. मात्र, काही जण ते मुद्दाम पेटवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला होता.