रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जानेवारी 2020 (16:32 IST)

भाजपमध्ये अंतगर्त वाद, कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा

भाजपाच्या भुसावळ अध्यक्ष पदासाठी जळगावमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, गिरीश महाजनही उपस्थित होते. मात्र, या बैठकीत पक्षातील दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. त्यामुळे रावसाहेब दानवे व्यासपीठ सोडून निघून गेले.
 
याबैठकीला पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व गिरीश महाजन हे उपस्थित होते. दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत बैठक सुरू असताना अचानक पक्षातील दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला जाऊन कार्यकर्त्यांनी एकमेकांवर शाईफेकही केली. कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी सुरू झालेली असताना रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन व्यासपीठावरच होते. वाद वाढल्यानंतर रावसाहेब दानवे बैठकीतून निघून गेले.