शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (08:10 IST)

पॉलिश करण्यासाठी दिलेले 36 लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेल्या कारागिरास अटक

पॉलिश करण्यासाठी दिलेले 36 लाखांचे सोन्याची दागिने घेऊन पसार झालेल्या कारागिरास 36 तासात पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 28 लाख रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.
 
मशुदिल उर्फ मैदुल लालचंद शेख (वय 52, रा. भोहरी आळी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
बुधवार पेठेत मनोज इंद्रजित मन्ना (वय 36) यांचे सराफी दुकान आहे. त्यांच्याकडे सराफी दुकानदार सोने व चांदी पॉलिश करण्यासाठी देतात. त्यांच्याकडे मशुदिल काम करत होता. गेल्या काही वर्षांपासून तो काम करत असे. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला होता. ते दागिने पॉलिश करण्यासाठी आरोपी मशुदिल याला दिले होते. त्याला विश्वासाने 35 लाख 80 हजार रुपयांचे दागिने फिर्यादी यांनी दिले होते. मात्र आरोपी मशुदिल हा दागिने घेऊन पसार झाला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी तात्काळ फरासखाना पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी मशुदिल हा दौड रेल्वे स्टेशन परिसरात थांबला असून, तो पश्चिम बंगालला पळून जाण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने या परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे दागिने मिळाले. त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 28 लाख 52 हजार रुपयांचे दागिने आणि इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.