गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जुलै 2021 (08:25 IST)

श्रीपाद छिंदमसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

अहमदनगरमध्ये एका टपरी धारकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दमदाटी करत,तसेच जातीवाचक शिव्या दिल्याप्रकरणी शिवद्रोही श्रीपाद छिंदम याच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये अट्रोसिटीसह विविध कलमाअंतर्गत  गुन्हा दाखल करण्यात आला असून,या घटनेमुळे वादग्रस्त छिंदम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरम्यान या प्रकरणी भागीरथ भानुदास बोडखे यांनी फिर्याद दिली आहे.
 
आरोपींमध्ये श्रीकांत शंकर छिंदम, श्रीपाद शंकर छिंदम, महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे, राजेंद्र म्याना यांचा समावेश आहे. 9 जुलै 2021 रोजी 12.30 वाजाण्याच्या सुमारास ही घटना घडली. दुपारच्या वेळी श्रीकांत शंकर छिंदम, श्रीपाद शंकर छिंदम,महेश सब्बन,राजेंद्र जमदाडे असे त्या ठिकाणी आले,भागीरथ याना शिविगाळ करु लागले. त्यांच्या सोबत सुमारे 30 ते 40 लोक होते.या ठिकाणी छिंदम याने तेथे एक क्रेन व JCB पण आणला होता.त्यावेळी श्रीकांत शंकर छिंदम,श्रीपाद शंकर छिंदम,महेश सब्बन,राजेंद्र जमदाडे,राजेंद्र म्याना यांनी ज्यूस सेन्टरमध्ये धुडगूस घातला व त्या ठिकाणी असलेले साहित्य त्यांनी फेकून दिले होते.

गल्यात असलेले धंद्याचे 5000 रुपये व यांच्या नातुला सोन्याची चैन घेण्यासाठी आणलेले 25,000 रुपये असे एकुण 30000/- रुपये श्रीपाद शंकर छिंदम याने काढुन घेतले. भागीरथ यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी 392, 448, 451,143,147,149, 427,504,506, अ .जा. अ ज 2015 चे कलम 3(1)(r).Za(e)अशा अट्रोसिटी सह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.