शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 11 जून 2023 (12:56 IST)

Cyclone Biparjoy: चक्रीवादळ 'बिपरजॉय' गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार!

हवामान खात्यानुसार, चक्रीवादळ बिपरजॉय पुढील २४ तासांत तीव्र होण्याची शक्यता आहे. हे वादळ उत्तर-ईशान्येकडे सरकण्याची शक्यता असून त्याचा धोका गुजरातवर आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातला धडकेल की नाही यावर हवामान विभाग (IMD) सतत लक्ष ठेवून आहे. 
 
बिपरजॉय चक्रीवादळाच्या सद्यस्थितीनुसार,  हे अत्यंत विनाशकारी चक्रीवादळ बिपरजॉय पोरबंदरपासून 620 किमी अंतरावर आहे. या वादळाचा प्रभाव 11 जूनपासून गुजरातच्या किनारपट्टीवर दिसून येईल. राज्यातील मच्छिमार आणि किनारी भागांना आधीच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 11 जून ते 14 जून या कालावधीत गुजरात किनारपट्टीवर 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वाऱ्याचा वेग येण्याची शक्यता आहे.
 
चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकण्यापूर्वी वलसाड बीचवर उंच लाटा उसळल्या आहेत. चक्रीवादळ बिपरजॉयच्या इशाऱ्यानंतर वलसाड प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तिथल समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद केला आहे.
 
पूर्व मध्य अरबी समुद्रातील विध्वंसक चक्रीवादळ BIPARJOY गेल्या 6 तासात 9 किमी प्रतितास वेगाने उत्तरेकडे सरकले आहे. चक्रीवादळ बिपरजॉय गोव्याच्या पश्चिमेला सुमारे 700 किमी, मुंबईच्या 630 किमी पश्चिम-नैऋत्येस, पोरबंदरच्या 620 किमी दक्षिण-नैऋत्येस आणि कराचीपासून 930 किमी दक्षिणेस आहे.
 
हवामान  विभाग कडून मिळालेल्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळाच्या अंदाजे मार्गात बदल झाला आहे. गेल्या 12 तासात चक्रीवादळ हळूहळू उत्तर ईशान्य दिशेने पुढे सरकत आहे. चक्रीवादळ कराचीच्या दक्षिणेला सुमारे 1,120 किमी अंतरावर होत. चक्रीवादळ च्या आजूबाजूच्या समुद्री भागात 130 ते 160 किमी ताशी वेगाने वारे वाहत आहे. 
भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळ पूर्वमध्य अरबी समुद्रावर 11 जून रविवारी मध्यरात्री पोरबंदरच्या दक्षिण- नैऋत्येस सुमारे 510 किलोमीटर अंतरावर होते. पुढील काही तासात हे चक्रीवादळ अधिक तीव्र होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 15 जून पर्यंत दुपारी बिपरजॉय चक्रीवादळ पाकिस्तान आणि लगतच्या सौराष्ट्र आणि कच्छच्या किनाऱ्याजवळ धडकण्याची शक्यता आहे.  
मच्छीमारांना 15 जून पर्यंत अरबी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. 
 


Edited by - Priya Dixit