शनिवार, 2 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 31 मे 2023 (08:24 IST)

दर्शन सोलंकी ४८३ पानांचे आरोपपत्र दाखल; अरमान खत्री आरोपी

मुंबई वसतिगृहाच्या इमारतीवरुन उडी घेऊन दर्शन सोलंकी या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येप्रकरणी अरमान इक्बाल खत्री या आरोपीविरुद्ध मंगळवारी विशेष तपास अधिकार्‍यांनी कोर्टात ४८३ पानांचे आरोपपत्र सादर केले. आरोपपत्रात दर्शनच्या कुटुंबियांसोबत पोलीस अधिकार्‍यांचे जबाब तसेच दर्शनची सुसाइड नोट पुरावा म्हणून जोडण्यात आली आहे.
 
मुंबई  १२ फेब्रुवारी २०२३ रोजी दर्शन सोलंकी या गुजरातच्या तरुणाने पवईतील आयआयटी वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली होती. जातीय भेदभावाने दर्शन सोलंकी ने आत्महत्या केल्याचा आरोप करुन त्याच्या कुटुंबियांनी पवई पोलिसांत तक्रार करुन संबधितांवर कारवाई करण्याची विनंती केली होती. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर दर्शन सोलंकी  ला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच इतर कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती.
 
याच दरम्यान ३ मार्चला या गुन्ह्यांचा तपास करणार्‍या विशेष पथकाला दर्शन सोलंकीच्या रुममधून एक सुसाइड नोट सापडली होती. त्यात त्याने अरमान खत्रीवर विद्यार्थ्यांवर गंभीर आरोप केले होते. ही सुसायट नोट हस्तलेखन विश्‍लेषणासाठी पाठविण्यात आली होती. त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर ती नोट दर्शननेच लिहिल्याचे नमूद करण्यात आले होते.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor