बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 25 मार्च 2019 (17:46 IST)

रंगपंचमीचा बेरंग, तलावात बुडून एकाचा मृत्यू

कोल्हापुरात रंगपंचमी खेळून राजाराम तलावात अंघोळीसाठी गेलेल्या एका तेवीस वर्षीय तरूणाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला.  सोमवार दुपारच्या सुमारास ही घटना घडली. 
 
रंगपंचमी खेळून हा तरूण राजाराम तलाव येथे आपल्या मित्रासोबत अंघोळीसाठी गेला होता. यावेळी पोहताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.