सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 11 ऑक्टोबर 2023 (10:40 IST)

Sangali News चादर धुण्यासाठी गेलेल्या बाप लेकाचा मृत्यू

death
Death of father and Son who went to wash sheets सांगली येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. यात तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील बंडगरवाडी येथे घडली. राजेंद्र आप्पाणा चव्हाण (वय 47) आणि मुलगा कार्तिक राजेंद्र चव्हाण (वय 17) अशी मृत्यू झालेल्या वडील आणि मुलाची नावं आहेत.
 
घरातील चादरी धुण्यासाठी राजेंद्र चव्हाण मुलगा कार्तिकला घेऊन गावातल्या तलावावर गेले होते. यावेळी चादरी धुण्यासाठी तलावात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे दोघे बाप-लेक पाण्यात बुडाले. ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलीस आणि  रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली.