शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 एप्रिल 2023 (22:01 IST)

बॅनरबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला

devendra fadnavis
नागपुरातील बुटीबोरी भागात भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावण्यात आले. बुटीबोरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी हे बॅनर लावले. या बॅनरवर भाजपच्या प्रमुख नेत्यांसह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील फोटो लावण्यात आला आहे. तर स्वतः बबलू गौतम यांनी स्वतःचा देखील फोटो या बॅनरवर लावलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
 
“संपूर्ण महाराष्ट्राचा ज्यांनी विकास घडविला फक्त आणि फक्त तेच मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार…” असे या बॅनरवर लिहिण्यात आलेले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकार पडणार असल्याच्या चर्चा खरंच आहेत का? असा प्रश्न या बॅनरबाजीमुळे निर्माण झाला आहे.
 
देवेंद्र फडणवीसांची संपप्त प्रतिक्रीया
या बॅनरबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, “ज्या कोणी हे बॅनर लावले असतील, त्यांनी ते काढून टाकावेत. असल्याप्रकारचा मूर्खपणा भाजपमध्ये तरी करू नका. मला वाटत नाही कोणी भाजपमधलं असेल. पण कोणी अतिउत्साही लोकं असतात. स्वतःचे नाव झाले पाहिजे, तेच असे करतात. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. 2024 मध्ये तेच मुख्यमंत्री असतील. त्यांच्याच नेतृत्वामध्ये आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढवू आणि जिंकून दाखवू.” असे फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor