सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 22 डिसेंबर 2024 (13:25 IST)

ठाण्यात उदबत्तीच्या धुरावरून वाद, हल्ल्यात 3 जखमी, आरोपींना अटक

arrest
ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे अजमेरा हाइट्स सोसयटीमध्ये अगरबत्ती पेटवण्याचा वादा वरुन हिंसाचार झाला शेजारी राहणाऱ्यानी आक्षेप घेतल्यावर मंत्रालयात काम करणारे अधिकारी अखिलेश शुक्ला यांनी काही लोकांना बोलावून देशमुख  कुटुंबातील तिघांना मारहाण केली. या घटनेमुळे महाराष्ट्रात पुन्हा अनिवासी आणि मराठ्यांचा प्रश्न निर्माण झाला. या प्रकरणी कल्याण खडकपाडा पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या विरोधात परस्पर गुन्हा दाखल करून आरोपी अखिलेश शुक्ला, त्यांची पत्नी आणि इतर चौघांना अटक केली आहे. शनिवारी सर्व आरोपींना कडेकोट पोलीस बंदोबस्तात कल्याण न्यायालयात हजर केले.

न्यायालयाने सर्व आरोपींना सहा दिवसांची कोठड़ी सुनावली आहे. आरोपी अखिलेश शुक्ला यांचे वकील अनिल एस पांडे म्हणाले की, मराठी किंवा अमराठी असा कोणताही मुद्दा नाही. प्रकरण केवळ अगरबत्तीच्या धुराचे होते, त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. शुक्ला यांनी दाखल केलेल्या दुसऱ्या एफआयआरला पोलिसांनी प्रतिसाद दिला नाही.  
 
माहितीनुसार, देशमुख आणि शुक्ला कुटुंब शेजारी-शेजारी राहतात अगरबत्ती पेटवण्यावरून दोघात वाद झाला आणि त्याचे रूपांतरण मारहाणित झाले. आरोपी शुक्लाने काही लोकांना बोलावून देशमुख कुटुंबातील तिघांना लोखंडी रॉड अणि लाठयांनी मारहाण केली. या मारहाणित देशमुख यांच्या भावला डोक्यात खोल जखमा झाल्या असून या प्रकरणी कलम 118-2अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
Edited By - Priya Dixit