सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 ऑक्टोबर 2023 (07:46 IST)

Drugs worth 6 crore seized सोलापुरात देवडी फाट्याजवळ ६ कोटींचे ड्रग्ज जप्त

Drugs worth 6 crore seized सोलापूर – चिंचोळी एमआयडीसीत मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने ड्रग्जवर केलेल्या कारवाईची राज्यभर चर्चा सुरू आहे. त्यातच मंगळवारी सोलापूर ग्रामीन पोलिसांनी मोठी कारवाई करून देवडी फाट्याजवळ जवळपास ६ कोटी १० लाख रुपये किंमत असलेले ३ किलो १० ग्रॅम ड्रग्ज पकडला.
 
सोलापुरात सलग दुसऱ्यांदा ड्रग्ज सापडण्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
 
दोनच दिवसांपूर्वीच चिंचोळी एमआयडीसीमधून मुंबई पोलिसांनी अचानक धाड टाकून 16 कोटीचे ड्रग्ज पकडले. या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मंगळवारी रात्री उशिरा ड्रग्ज घेऊन देवडी फाट्यावर आलेल्या दोघांवर मोहोळ पोलिसांनी ही कारवाई केली.