रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 मार्च 2024 (09:30 IST)

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात भूकंपाचे धक्के ; 4.2 रिश्टर स्केल इतकी तीव्रता

earthquake
मराठवाड्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरले आहे. नांदेड, परभणी, हिंगोलीमध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळत आहे.
 
सकाळी मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली भागांत भूकंपाचे धक्के जाणवले. अनेकजण घाबरुन घराबाहेर आले. नांदेडच्या उत्तर भागात भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळत आहे. भूकंपाची तीव्रत रिश्टर स्केलवर 4.2 अशी नोंद करण्यात आली आहे. अनेक लोक घाबरून रस्त्यावर आले. दरम्यान, यापूर्वी मार्चच्या पहिल्या आठवड्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते.
 
भूकंपाचं केंद्र हिंगोलीजवळ
हिंगोली जिल्ह्यात दोन भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात असून 3.6 तर 4.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज सकाळी सहा वाजून नऊ मिनिटाच्या सुमारास भूकंपाचे दोन धक्के जाणवले आहेत.
 
या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर असून याची तीव्रता हिंगोली परभणी नांदेड या तीनही जिल्ह्यातील गावांना या लोकांची तीव्रता जाणवली आहे. या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी सहा वाजताच्या सुमारास झालेल्या त्यामुळे अनेक घरांच्या भिंतीना छोट्या भेगा गेल्याची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीच वातावरण निर्माण झाला आहे. दांडेगाव येथील अनेक सिमेंटच्या घरांना तडे गेले आहेत.
Edited By -Ratnadeep Ranshoor