शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 जुलै 2024 (09:23 IST)

नांदेड, हिंगोली, परभणीमध्ये सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले

earthquake
हिंगोली येथे आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 इतकी मोजण्यात आली आहे. सकाळी 7.14 वाजता हा भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ही माहिती दिली आहे.सकाळी परभणी, नांदेड आणि हिंगोलीत भूकंपाचे धक्के जाणवले. या मुळे नागरिकांमध्ये घबराहट पसरली आहे. परिसरात भीतीच वातावरण आहे. 
 
प्रशासनाकडून नागरिकांनी घाबरून जाये नये असे आवाहन करण्यात आले आहे.आज सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले असून ओढा, हिंगोली, वसमतसह संपूर्ण जिल्यात जमिनीला हादरा बसला. घरातील भांडे पडले आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. लोकांनी लगेच घरातून बाहेर पडत रस्त्यावर एकत्र झाले. रिश्टरस्केल वर भूकंपाची तीव्रता 4.5नोंदली गेली. 
 
नांदेड मध्ये पण सकाळी 7:15 वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. एकाएकी जमीन हादरल्यामुळे नागरिकांमध्ये घबराहट पसरली.रिश्टर स्केल वर या भूकंपाची तीव्रता 4.2 मोजण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात होता.

परभणी येथे देखील अनेक जिल्ह्यात सकाळी भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते . परभणीत रिश्टर स्केल वर भुकंम्पाची तीव्रता 4.2 होती. नागरिकांना घाबरून जाऊ नये प्रशासनाकडून असे आवाहन करण्यात आले आहे. 
Edited by - Priya Dixit