शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (12:07 IST)

ED ची मोठी कारवाई: मनी लाँडरिंग प्रकरणात एकनाथ खडसेंची मालमत्ता जप्त

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना मनी लाँडरिंग प्रकरणात मोठा धक्का दिला आहे. ईडीने एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांची संपत्ती जप्त केली आहे. 
 
भोसरी MIDC तील जमीन खरेदी प्रकरणामुळे खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून ईडीने खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील मालमत्ता जप्त केली आहे. ईडीची एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई करत ५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. 
 
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी ईडीकडून केली जात होती. एका प्रकरणात खडसे यांच्या जावयाला ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता एकनाथ खडसेंवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात एकनाथ खडसेंची चौकशी केली जात असतानाच ही कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे. एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे आणि गिरीश चौधरी यांची एकूण 5.73 कोटीची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. यामध्ये लोणावळ्यातील एक बंगला, जळगावमधील तीन जमिनीचे प्लॉट आणि तीन फ्लॅट जप्त करण्यात आले असल्याची माहिती मिळते आहे.