सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शैक्षणिक सहलीच्या बसचा भीषण अपघात, शिक्षक जागीच ठार

सोलापूर जिल्हात माळशिरस तालुक्यात वटपळी गावा नजीक बावडा (ता. इंदापूर) येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीस गेलेल्या एस. टी. ची टेम्पोस पाठीमागून धडक होऊन झालेल्या अपघातात एका शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची तर अन्य एक शिक्षक जखमी झाल्याची बातमी आहे.
 
ही घटना आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास झाली आहे. माळशिरस तालुक्यातील पाटील वस्ती लगत बस व टेम्पोची धडक झाल्याने हा अपघात झाला. यामध्ये एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला तर सहा विद्यार्थी व शिक्षक जखमी झाले. बसमध्ये चालक, 2 पुरुष व 2 महिला असे एकूण 4 शिक्षक व 40 विद्यार्थी होते. 
 
मिळालेल्या माहितीनुसार अकलुज आगाराची एम एच 14 बी.टी. 4701 ही बस इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाची शैक्षणिक सहल घेऊन गेली होती. बसमध्ये चालक, 2 पुरुष व 2 महिला असे एकूण 4 शिक्षक व 40 विद्यार्थी होते. 
 
आज पहाटे बस आणि टेम्पो मध्ये अपघात झाल्याने एकाचा मृत्यू झाला तर एक शिक्षकासह काही विद्यार्थी जखमी आहेत. जखमींना 108 सेवेच्या रुग्णवाहिकेतून अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार कामी दाखल करण्यात आले आहे.